⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे १५ रोजी गीतगोविंद मैफील

गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे १५ रोजी गीतगोविंद मैफील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२४ । जळगव येथील गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही गीतगोविंद सुरेल मैफीलीचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी माजी खा. डॉ.उल्हास पाटील हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द वकील अ‍ॅड सुशिल अत्रे, गोदावरी फॉउंडेशनच्या प्रेरणास्त्रोत श्रीमती गोदावरी पाटील, सचिव व संगीत महाविद्यालयाच्या संचालीका डॉ.वर्षा पाटील, सदस्या व प्रदेश भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील, डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्य पदमजा नेवे इ मान्यवर उपस्थीत राहणार आहे.

गोदावरी संगीत महाविद्यालयाचे सभागृह भास्कर मार्केट जळगाव येथे शनिवार दि १५ जून रोजी सायंकाळी ६ वा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी कृष्ण गिते तसेच इतर नृत्य प्रकार सादर केले जाणार असून मान्यवरांचे हस्ते अ‍ॅड महिमा मिश्रा अयंगार लिखित महाराज कृष्ण कुमार व्यक्‍तीत्व व कृतित्व पुस्तकाचे विमोचन देखिल केले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी उपस्थीती दयावी ही नम्र विनंती.असे आवाहन गोदावरी संगित महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.