---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा हादरला : अल्पवयीन तरुणीवर तीन नराधम तरुणांनी…!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ ।  जळगाव जिल्ह्याला हादरवणारी घटना घडली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तीन नराधम तरुणांनी शेतात वारंवार अत्याचार केल्याने तरुणी गर्भवती राहिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

crime 1 jpg webp

पारोळा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घटनेप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपींनी तरुणीचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

---Advertisement---

या प्रकरणी बारकू उर्फ प्रवीण बाळू पाटील (23), पप्पू उर्फ शुभम बापू पाटील (23, दोघे रा.सावखेडा तुर्क, ता.पारोळा) आणि भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (25, रा.सावखेडा होळ, ता.पारोळा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

16 वर्षीय पिडितेच्या तक्रारीनुसार, पारोळा तालुक्यातील ज्या शेत शिवारात ती कामाला जात अतस तेथे-तेथे संशयित शेतात कामाला येत जवळीक वाढून कधी एकाने तर दोघांनी अत्याचार केला शिवाय हा प्रकार सांगितल्यास तुझा आम्ही व्हिडिओ बनवला असून तो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा वारंवार अत्याचार करायचे. या प्रकारानंतर फिर्यादीच्या पोटात दुखू लागल्याने तिने ही बाब आईला सांगितल्यानंतर 11 एप्रिल रोजी खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता पीडीता ही 16 आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्याने कुटुंबियांना धक्काच बसला

या प्रकरणी पीडीतेने पारोळा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून संशयित बारकू उर्फ प्रवीण पाटील (23), पप्पू उर्फ शुभम बापू पाटील (23) व भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (25) यांच्याविरोधात पारोळा पोलिसांनी पोस्को, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच तिघां संशयित आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---