Rain News : जळगाव जिल्ह्यात पुढील चार‎ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

जून 23, 2022 11:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । जून संपण्यासाठी केवळ एक आठवडा शिल्लक असून, अजूनही जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाने पाठ फिरवली आहे. मागील दोन तीन दिवसापासून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग आला असून काही ठिकाणी पेरण्या रखडलया आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुढील चार‎ दिवसात तुरळक ठिकाणी मुसळधार‎ पाऊस हाेवू शकताे असा हवामान‎ विभागाचा अंदाज आहे तर संपुर्ण‎ उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस‎ दमदार पाऊस हाेण्याची शक्यता‎ आहे.‎

rain 1 2 jpg webp

मान्सून दाखल झाल्यानंतर सुमारे दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. जळगाव‎ जिल्ह्याभरात प्रतीक्षा असलेल्या मान्सूनचे मंगळवार आणि बुधवारी आगमन झाले. पूर्वेकडील‎ भुसावळ, मुक्ताईनगर, बाेदवड तर ‎ ‎ पश्चिमेकडील अमळनेर,‎ धरणगाव, भडगाव या तालुक्यात ‎ ‎पावसाने दमदार हजेरी लावली.

काल बुधवारी जळगाव शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात बुधवारी ९.५ मिलिमीटर‎ इतका सरासरी पाऊस झाला.‎ मान्सूनचे आगमन हाेवून‎ आठवडा उलटूनदेखील पावसाचा‎ जाेर नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पुरेशी ओल ‎नसल्याने शेतकरी पेरणी करू‎ शकले नाहीत. दरम्यान,‎ रविवारपासून पुन्हा पावसाला प्रारंभ ‎झाला असून मंगळवार आणि‎ बुधवारी पावसाने हजेरी लावली. ‎

या वर्षी जून महिन्यात पर्जन्यमान‎ अत्यंत कमी असून २२ जूनपर्यंत या‎ महिन्यातील सरासरीच्या अवघा‎ ५०.७ टक्के पाऊस झाला आहे.‎ जिल्ह्यात ४६ मिमी पाऊस झाला.‎ २२ जूनपर्यंत सरासरी ९०.७ मिमी‎ पाऊस हाेणे अपेक्षीत असते.‎ प्रत्यक्षात ४६ मिमी पाऊस झाला‎ आहे. पिकांसाठी आणखी दमदार‎ पावसाची अपेक्षा आहे.‎ दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुढील चार‎ दिवसात तुरळक ठिकाणी मुसळधार‎ पाऊस हाेवू शकताे असा हवामान‎ विभागाचा अंदाज आहे तर संपुर्ण‎ उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस‎ दमदार पाऊस हाेण्याची शक्यता‎ आहे.‎

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now