---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला; ३ जुलैपर्यंत असा आहे पावसाचा अंदाज?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२४ । जळगावकरांसाठी दिलासा देणारी बातमीचा आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्यापासून जळगावात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. मात्र शुक्रवारी जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. दरम्यान जळगावसह राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज आहे. जळगावात ३ जुलैपर्यंत गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Add a little bit of body text jpg webp

राज्यात पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान घटले असून पावसाला पूरक असे वातावरण तयार झाले आहे त्यामुळे राज्यात थोड्याच दिवसात पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज पुणे ,सातारा सह संपूर्ण विदर्भ आणि मराठवड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

---Advertisement---

जळगावात दमदार पाऊस ;
दरम्यान मागील काही दिवसापासून जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ सुरु होता. जळगावकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. अशातच शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. या पावसामुळे पेरणीच्या कामांना आता वेग येणार आहे. दरम्यान ३ जुलैपर्यंत जळगावात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

असा राहणार आठवडा
२९ जून : गडगडाटासह मध्यम पाऊस, अंशतः आकाश ढगाळलेले राहणार.
३० जून : संध्याकाळी व रात्री जोरदार मेघगर्जनेसह हलका पाऊस होऊ शकतो.
१ जुलै : संध्याकाळी आणि रात्री पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाज आहे.
२ जुलै : दुपारपासून मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट, वेगाने वारे वाहणार.
३ जुलै : सायंकाळी तुरळक पावसाच्या सरी कोसळणार, मेघगर्जनाही होणार.

जळगांव जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमा
29/6/2024
अमळनेर-54
बोदवड-75
जामनेर-18
चोपडा-14
चाळीसगाव-2
रावेर-2
मुक्ताईनगर-18
धरणगाव-21
यावल-85.3
एरंडोल-12
जळगाव-50

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---