जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात विविध १७ ठिकाणी शासनाने गहू, मका व ज्वारी हमीभाव खरेदी करण्यांस मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुक्यात असलेल्या खरेदी विक्री संघात जाऊन ३० एप्रिल २०२१ पर्यत नांवे ऑनलाईन नावे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा विपणन विभागाचे विपणन अधिकारी गजानन मगरे यांनी केले आहे.
गतवर्षी खरिप हंगामात सरासरी पेक्षा बर्यापैकी पाऊस झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहु, मका व ज्वारी या पिकाची लागवड केली होती. मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गहु, मका व ज्वारीचे उत्पन्न आले. परंतु बाजारात हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून त्यानुसार शासनाने गहू, मका व ज्वारी हमीभाव खरेदी करण्यांस मान्यता दिली आहे.
त्यानुसार जिल्ह्यात जळगाव आणि जामनेर येथे प्रत्येकी दोन तर अन्य १५ ठिकाणी तालुका स्तरावर असलेल्या शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ संस्थांत्मक स्तरावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर गहू, मका व ज्वारी हमीभाव खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुक्यात असलेल्या खरेदी विक्री संघात जाऊन ३० एप्रिल २०२१ पर्यंत नावे नोंदविल्यानंतर खरेदी प्रक्रिया शासनाकडून आलेल्या निर्णय मार्गदर्शनानुसार राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या हमीभाव योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे.
हे कागदपत्र आवश्यक
शेतकऱ्यांनी शासन हमीभाव केंद्रांवर रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू उत्पादन विक्रीसाठी ऑनलाईन पद्वतीने नांवे नोंदवावीत. नोंदणी करतांना आधारकार्ड, पिकपेरा असलेला ७/१२ उतारा व बँकेचे पासबुक सोबत आणावे.शेतकऱ्यांनी ३० एप्रिल २०२१ पर्यंत नावे नोंदविल्यानंतर खरेदी प्रक्रिया शासनाकडून आलेल्या निर्णय मार्गदर्शनानुसार राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा फायदा घ्यावा.