जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. कारकून(सपोर्ट स्टाफ) या पदासाठी ही भरती होणार असून या भरतीसाठी ग्रॅज्युएट्स पास असलेल्या तरुणांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच १९ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होत आहे. Jalgaon DCC Bank Bharti 2025

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ https://jalgaondcc.com/ वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो लक्ष्यात असू द्या या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. Jalgaon DCC Bank Bharti Recruitment 2025

पदाचे नाव : कारकून(सपोर्ट स्टाफ)
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 50% मार्कानी उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा पदव्युत्तर परिक्षा MSCIT किंवा शासन मान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा. कोणत्याही शाखेतून बी.ई. उत्तीर्ण उमेदवार तसेच बी.एस.सी. (संगणक) व कृषी पदवी धारक उमेदवारांसाठी सदरची अट शिथील राहील.
वयाची अट: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 35 वर्षे असावे
नोकरी ठिकाण: जळगाव
परीक्षा शुल्क: ₹1000/-

| अधिकृत संकेतस्थळ | https://jalgaondcc.com/ |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
निवड कार्यपध्दती :-
1) ऑन लाईन परिक्षा :- कारकून (सपोर्ट स्टाफ) श्रेणीतील पदांकरीता 90 गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील यामध्ये (Reasoning, English Language, General Awareness (with special reference to banking), Computer Knowledge, Quantitative Aptitude Test या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल, तसेच परिक्षेचे माध्यम इंग्रजी / मराठी असेल.
2) कागदपत्रे पडताळणी :- उमेदवारास ऑनलाईन परिक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे बँक धोरणा प्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यावेळी उमेदवाराने मुळ कागदपत्रे उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल.
3) मुलाखत :- कारकून (सपोर्ट स्टाफ) पदासाठी लेखी परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावयाचे पद संख्येच्या प्रमाणात लेखी परिक्षेचे गुणानुक्रमे 10 गुणांसाठी मुलाखतीस बोलविण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतीम निवडीस पात्र राहणार नाही.
परिविक्षाधीन कालावधी (प्रोबेशन पिरियड):
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सेवेत नेमणुक दिली जाईल नेमणुक दिलेल्या उमेदवारास परिविक्षाधीन कालावधीमध्ये रु.13,000/- दरमहा संकलित पगार देण्यात येईल.






