थंडीने जळगावकर गारठले! पारा ७ अंशावर, सहा वर्षानंतर तापमान सर्वात कमी

डिसेंबर 12, 2025 11:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२५ । उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. दरम्यान जळगावचा पारा ७ अंश सेल्सिअसवर घसरला असून, हा या हंगामातील सर्वांत कमी तापमानाचा अनुभव आहे.

tapman thandi

गेल्या ६ वर्षांत डिसेंबरमध्ये इतके कमी तापमान फक्त २०१९ मध्ये (६.४ अंश) नोंदवले गेले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पारा ८ अंशांच्या खाली राहण्याची तसेच धुके आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या डोके एवढे दाट आहे की दृश्यमानता 40 मीटरपर्यंत आलेली आहे.

जळगावात या आठवड्याच्या सुरुवातीपासून तापमानात घसरण दिसून आली. रविवारी (७ डिसेंबर) १२ अंशावर असलेला पारा आतापर्यंत ५ अंशांनी घसरला आहे. तापमानात घसरण झाल्याने दुसरीकडे थंडीचा कडाका वाढला आहे. यंदाच्या हंगामातील सर्वांत कमी तापमानाची नोंद १० डिसेंबर रोजी रात्री करण्यात आली आहे.

रात्री तापमानाचा पारा थेट ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला होता. यापूर्वी १८ नोव्हेंबर रोजी पारा ७.१ अंशांवर गेला होता. यंदा डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच तापमानाचा पारा ७ अंशांवर गेला आहे. गेल्या ६ वर्षातील डिसेंबर महिन्यातील हा सर्वात कमी तापमानाचा रेकॉर्ड आहे. याआधी २०१९ मध्ये डिसेंबर महिन्यात पारा ६.४ अंशावर गेला होता, तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो ७.४ अंशांपर्यंत खाली आला होता. दरम्यान रात्रीच्या तापमानात घसरण झाली असली तरी दिवसा उन्हाचा चटका बसत आहे. दिवसाचे तापमान २८ अंशावर स्थिर आहे

दरम्यान आगामी दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असून, पारा ८ अंशांच्य खालीच राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर तापमानात थोडाफार चढ-उतार होईल; मात्र एकूणच तापमानाच पारा ८ ते १२ अंशांदरम्यानच राहण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories