⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहराची ओळख : सुवर्णनगरी, सर्वात उंच मनपा, ऐतिहासिक टॉवर, मेहरूणची बोरं

जळगाव शहराची ओळख : सुवर्णनगरी, सर्वात उंच मनपा, ऐतिहासिक टॉवर, मेहरूणची बोरं

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २८ सप्टेंबर २०२१ | जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून जळगाव जिल्ह्याचे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं होते. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी आम्हाला हे पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. कॉफी टेबल बुकच्या सदस्य समितीत तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिघावकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, गांधी रिसर्च फाउंडेशनचे भुजंग बोबडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, प्राचार्य बी.एन.पाटील, संचालक एस.टी.इंगळे, कवी वा.ना.आंधळे, डॉ.एम.के.जाधव, ज्येष्ठ पत्रकार राजेश यावलकर, छायाचित्रकार तुषार मानकर, छायाचित्रकार सुमित देशमुख यांच्या मेहनतीने हे पुस्तक अस्तित्वात आले. याच पुस्तकाच्या आधार घेत जळगाव लाईव्ह पर्यटन विशेष मालिका सुरु करत आहे.

जळगाव हे शहर मुंबई-भुसावळ-दिल्ली रेल्वेमार्गावर व धुळे-मुक्ताईनगर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर आहे. जळगाव हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जळगाव शहर हे जिल्ह्यातील इतर शहरांना रस्ते आणि रेल्वेच्या माध्यमातून जोडले गेले आहे. जळगाव शहरात अनेक सरकारी कार्यालये, व्यापारी संकुले, शॉपिंग मॉल्स, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, शाळा आणि निवासी संकुले आहेत. ‘बनाना सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर महाराष्ट्रातील केळी उत्पादनास महत्त्वाचा हातभार लावते. तसेच शुद्ध सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ प्रसिद्ध असल्याने ‘सुवर्णनगरी’ अशीही त्याची ओळख आहे.

जळगाव महापालिका शहराची लोकसंख्या सुमारे ४.६० लक्ष आहे. जळगाव शहरात ओंकारेश्वर मंदिर, मेहरूण तलाव, गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान, गांधीतीर्थ, अहिंसा तीर्थ ही पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत. जळगाव हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. जळगाव शहरात बस, रेल्वे आणि हवाई वाहतूक अशी प्रवासाची साधने उपलब्ध असून हे शहर मुंबईशी थेट हवाईमार्गाने जोडलेले आहे. ड्याळांचे मनोरे शहराच्या मध्यभागी असलेल्या घ चौकात उभे करण्याची संकल्पना ब्रिटिशांनी भारतात आणली. भारतातील महत्त्वाच्या क्लॉक टॉवरमध्ये मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर, घड्याळ गोदी, हुसेनाबाई क्लॉक टॉवर (लखनऊ), चौरा बझार क्लॉक टॉवर (हैदराबाद), देहरादून क्लॉक टॉवर, घंटा घर (मिर्झापूर), घंटा घर (जोधपूर), मिंट क्लॉक टॉवर (चेन्नई), क्लॉक टॉवर (म्हैसूर) यांचा समावेश आहे.

अशाच महत्त्वाच्या टॉवर्समध्ये जळगाव येथील शास्त्री टॉवरचा उल्लेख केला जातो. शहरातील अतिशय महत्त्वाचा आणि गजबजलेला चौक म्हणून शास्त्री टॉवर चौकाची ओळख आहे. टॉवरच्या दहाव्या मजल्यावर असलेल्या घड्याळाचे डायल १२ फूट आहे. घड्याळाचा मोठा काटा ६ फूट लांब आणि लहान काटा ५.५ फूट लांब आहे. घड्याळाची वाइंडिंग चेन ही ७२ फूट लांबीची आहे. घड्याळाला ऊर्जा देण्यासाठी २०० किलो वजनाच्या चार तबकड्या आहेत. घड्याळात पितळ्याचे चाक असून दर आठ दिवसांनी घड्याळाला चावी द्यावी लागते. गेली काही वर्षे बंद असलेल्या या घड्याळाच्या दुरुस्तीसाठी जळगाव येथील जैन उद्योग समूहाने पुढाकार घेऊन ते पूर्ववत सुरू केले आहे. जळगाव महानगरपालिकेची इमारत ही आशिया खंडातील सर्वात उंच इमारत आहे.एकूण १७ मजली उंच असलेली इमारत गोलाणी यांनी बनवलेली. ही इमारत पूर्ण व्हायला ५ वर्ष लागली होती.

जळगावमध्ये शिवाजीनगर रोडवर प्रशस्त जैन मंदिर आहे. हे मंदिर सन १८९० मध्ये बांधण्यात आलेले असून ते पोरबंदर पाषाणातील शिल्पकला शैलीतून साकारलेले आहे. तसेच ओमकारेश्वर मंदिराजवळ लाल पाषाणातील जैन मंदिर असून जळगाव- -धुळे रस्त्यावर संगमरवरातील सुबक कलाकुसर केलेले भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे. त्याला दादावाडी असे म्हणतात. तेथे श्रावण वद्य अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत उत्सव साजरा करण्यात येतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.