जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नसून अशातच शहरातील दूध फेडरेशन रोडवर मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली. चालत्या चाकीमध्ये गोळीबार होऊन एका 25 वर्षीय तरुणाच्या पाठीत उजव्या बाजूस शरीरास घुसली असून तो जखमी झाला आहे. नाजीम फिरोज पटेल ( वय २५) असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली.दरम्यान याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील नाजीम फिरोज पटेल ( वय २५) हा तरुण शेप बनवण्याचा व्यवसाय करीत असून पाळधी येथे आई-वडील दोन भाऊ यांच्यासह वास्तव्यास आहे. 14 मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास नाझीम पटेल हे आपले मामा बबलू पटेल व मित्र तो हित देशपांडे अल्ताफ शेख यांच्यासह चार चाकी क्रमांक MH.19.Q.7514 याने भुसावळ येथे एका कार्यक्रमात रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोहोचले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर पारधी येथे जात असताना पुन्हा जळगाव शहरातील दूध फेडरेशन रस्त्यावरून जात असताना बबलू पटेल हे चार चाकी गाडी चालवत असताना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक नाझीम पटेल यांच्या मागून बंदुकीचे गोळी फायर करण्याचा आवाज आला आणि बंदुकीतून निघालेली गोळी त्यांच्या पाठीत उजव्या बाजूस शरीरात घुसली होती.
घटना घडल्यानंतर लागलीच. नाजिम पटेल यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी जळगाव शहर पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते रात्री उशिरा संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय राम शिखरे हे करीत आहे.