---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२३ । मागील काही महिन्यांपासून प्रभाग क्र. १ व २ मध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांच्या परिसरात नेमून दिलेले काम करीत नसून या युनिट कर्मचार्‍यांची तात्काळ चौकशी करुन त्यात दोषी आढळून आल्यास त्यांचेवर उचित कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंगे्रस महानगरउपाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी मंगळवारी आयुक्तांकडे निवदेनाव्दारे केली आहे.

मनपा 4 jpg webp

निवेदनाचा आशय असा की, गेल्या काही महिन्यांपासून प्रभाग क्रमांक १ व २ मधील नागरिक आरोग्य विभागातील कर्मचारी त्यांच्या परिसरात नेमून दिलेले काम करीत नसून कामावर देखील हजर राहत नाहीत, अशी तक्रार नागरिक करत आहेत. या अनुषंगाने भगवान सोनवणे यांनी संबंधित युनिटवर प्रत्यक्ष जाऊन अनेक वेळा याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्याठिकाणी कर्मचारी हजर नसून फक्त हजेरी पुस्तकावर त्यांनी सह्या करुन निघून गेल्याचे सोनवणे यांना आढळून आले. याविषयी संबंधितांना वारंवार विनंती करुन व समज देऊन देखील त्यांचे वर्तनात कुठलाही बदल झालेला नाही.

---Advertisement---

त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य विषयक समस्या वाढत आहेत. महापालिकेत वेळोवेळी कर भरणाा करणार्‍या नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. परंतु तोच मनपाकडून डावलला जात आहे. तरी याची तात्काळ दखल घेऊन प्रभाग क्रमांक १ व २ यांचेशी संबंधित असणार्‍या युनिट कर्मचार्‍यांची तत्काळ चौकशी करुन त्यात दोषी आढळून आल्यास त्यांचेवर उचित कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांची तात्काळ आमच्या प्रभागातून बदली करण्यात यावी अशी मागणी भगवान सोनवणे यांनी केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---