चिमणआबांना लागली मंत्रिपदाची आस म्हणतात….
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । शिंदे गटातील मंत्रीमंडळाचा विस्तार नुकताच झाला. यावेळी जळगाव जिल्ह्यातून गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री झाले. मात्र जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील यांचा नंबर न लागल्याने पुढील टप्प्यात तरी आपला नंबर लागणार असल्याची आस लागली आहे.
मंत्रीमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार दोन दिवसांपूर्वीच पार पडला. यात जळगाव जिल्ह्यातून माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.मात्र त्यांच्याहून जेष्ठ असलेल्या शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार चिमणराव पाटील यांना संधी मिळालेली नाही. मात्र आपल्याला दुसर्या विस्तारात स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे.
टिव्ही९ ला दिलेल्या मुलाखतीत पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, मंत्रीपदाची अपेक्षा बाळगण्यात काहीही गैर नाही. पहिल्या विस्तारात आपला क्रमांक लागला नसला तरी दुसर्या टप्प्यात आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा असल्याचे आमदार पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले.