अरेरे : मनपामध्ये नागरिकांना लिफ्ट मिळणं झालं कठीण
जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | जळगाव शहर महानगरपालिकेतील मुख्य इमारतीमध्ये नागरिक आपली काम घेऊन येत असतात. अशा नागरिकांना वरच्या मजल्यावर असलेल्या दालनांमध्ये काम असल्यास लिफ्टचा वापर करावा लागतो. मात्र या लिफ्ट मिळणं नागरिकांसाठी कठीण गोष्ट म्हणून बसली आहे.
जळगाव शहर मनपातील मुख्य इमारत म्हणजेच 17 मजली साठी काही वर्षांपूर्वी सहा कोटी रुपये खर्च करून सहा लिफ्ट घेण्यात आल्या होत्या. मात्र या सहा लिफ्ट पैकी केवळ दोन लिफ्ट सुरू असून इतर चार लिफ्ट वेगवेगळ्या कारणामुळे बंद आहेत. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. मनपामध्ये नागरिक आले की त्यांना विविध कामांसाठी विविध दालनांमध्ये जावं लागतं. मात्र लिफ्टच्या गैरसोयीमुळे नागरिकांची फरफट होत आहे.
जळगाव शहर मनपातील सहापैकी चार लिफ्ट वेगवेगळ्या कामाने बंद असतात. कित्येकदा त्यांच्या देखरेखीसाठी त्या बंद करण्यात येतात. यामुळे दोन लेफ्ट या केवळ नागरिकांच्या सोयीसाठी ठेवण्यात येतात. मात्र एका लिफ्ट मध्ये फक्त सात जण चढू शकतात. तर दुसरी लिफ्ट ही सर्वसामान्य नागरिकांसाठी नसते ती केवळ मनपा नगरसेवक अधिकारी पदाधिकारी व इतर प्रमुख पाहुण्यांसाठी असते. यामुळे केवळ एका लिफ्ट मधूनच नागरिकांना प्रवास करावा लागत असून यामुळे नागरिकांची मोठी फरफट होत आहे.
कित्येकदा विविध कामांसाठी आम्ही मनपा मध्ये जातो. मात्र लिफ्ट मिळणं अतिशय अवघड बनल आहे. मनपा कर्मचाऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांची यामुळे मोठे फरपट होत आहे. अशावेळी या लेफ्ट लवकरात लवकर व्हावे अशी आमची विनंती आहे.
सायसिंग पाडवी ,नागरिक, जळगाव