Sunday, July 3, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

महाविकास आघाडीत फूट पडो की तुट पडो फरक पडत नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील

gulabrao patil
चिन्मय जगतापbyचिन्मय जगताप
June 13, 2022 | 8:02 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ ।महाविकास आघाडीत फूट पडो कि तुट पडो मला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवारी दिली. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी मध्ये तूट पडते कि फूट पडते याने मला फरक पडत नाही. मी शिवसैनिक आहे. मी इंजिनाकडे बघतो डब्यांची मला काही पडलेली नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली

राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडी मध्ये फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर याबाबतच्या बातम्या देखील दैनिकांमधून व विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. याबाबतच आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारले असता त्यांनी थेट मला काही फरक पडत नाही. मी शिवसेनेचा आहे. अशा शब्दात उत्तर दिल्याने आता महाविकासआघाडीत फूट पडणार की काय? या चर्चांना उधाण आले आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात भव्य माता व बाल संगोपन हॉस्पीटल उभारण्यात येत असून आज या इमारतीच्या कामाचे भूमिपुजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. प्रमोद पांढरे, इंजि. हरिष पवार, किशोर पाटील, योगेश जावरे, संगोयोचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, आरोग्यसेवक डंपिं सोनवणे, भूषण पाटील, डॉ. गायकवाड,   ठेकेदार गणेश ठाकरे यांच्यासह  डॉक्टर, व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

कोविडच्या आपत्तीमुळे जिल्हा आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. यामुळे या आपत्तीवर आपण यशस्वीपणे मात केली असून आता माता व बाल संगोपन हॉस्पीटलच्या माध्यमातून नवजात शिशू आणि प्रसूत मातांसाठी अतिशय अत्याधुनीक अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. हे १०० खाटांचे रूग्णालय मॉडेल हॉस्पीटल म्हणून लौकीकास येणार असून ते गोरगरिबांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते शासकीय आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या १०० खाटांची सुविधा असणार्‍या आणि तब्बल २८ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेल्या माता व बाल संगोपन केंद्राच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते. सदर हॉस्पीटल हे सुमारे १३ ते १४ महिन्यांमध्येच पूर्ण होणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांनी दिली.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण
SendShareTweet
चिन्मय जगताप

चिन्मय जगताप

पत्रकारिता क्षेत्रात गत ३ वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरात रिऍलिटी चेकचा विशेष अनुभव. मनपा, राजकारण क्षेत्रातील वृत्त संकलन. लाईव्ह, स्टुडिओत अँकरिंग. विशेष मुलाखतींची हाताळणी. विशेष वृत्त लेखन तसेच वृत्त संपादन.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
accident

लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाचा घाला : नीलगायला धडक देत रिक्षा चक्काचूर, १ ठार, चौघे जखमी

Rashi B

आजचे राशिभविष्य - १४ जून २०२२, 'या' राशीतील व्यक्ती आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल...

gold silver rate 2

आज स्वस्तात खरेदीचा चान्स ; सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण, लगेचच तपासा भाव

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group