10वी+ITI सर्टिफिकेट असेल तर ISRO मध्ये मिळेल नोकरी, पगार 69000 मिळेल

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुमच्याकडे जर 10वी, ITI सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ISRO मध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. ISRO विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने तंत्रज्ञ-A, Drautsman-B आणि Radiographer-A ची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. ISRO Recruitment 2023

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार असून यासाठी अर्ज प्रक्रिया 4 मे पासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 मे 2023 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी जाहिरात वाचून काळजीपूर्वक अर्ज करावा.

मुंबईत केंद्रीय नोकरीची संधी..! तब्बल 4374 पदांची भरती

इस्रो भर्ती अंतर्गत भरल्या जाणार्‍या पदांची संख्या
49 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे, त्यापैकी 43 रिक्त पदे तंत्रज्ञ-A पदासाठी, 5 रिक्त जागा ड्रॉफ्ट्समन-B पदासाठी आणि 1 रिक्त जागा रेडिओग्राफर पदासाठी आहे.

शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रासह कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10 वी पास असणे आवश्यक आहे. (सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)

इस्रो भारती साठी महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 मे 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे 2023

शुल्क
यूआर / ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी – रु. 100/-
SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क- शून्य

पगार
तंत्रज्ञ-बी- स्तर 03, रु.21700 ते रु.69100
ड्राफ्ट्समन-बी- लेव्हल 03, रु.21700 ते रु.69100
रेडिओग्राफर-ए- लेव्हल 04, रु.25500 ते रु.81100/-

वयोमर्यादा
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांची वयोमर्यादा ३५ वर्षे असावी.

अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा