---Advertisement---
महाराष्ट्र भुसावळ विशेष

भुसावळला भूकंपाचे झटके बसल्यानंतर इंटरनेटवर सर्च होतयं; महाराष्ट्र भूकंपप्रवण क्षेत्रात आहे का?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २७ जानेवारी २०२३ | जिल्हयातील भुसावळ, सावदा परिसरात आज दि. २७ रोजी सकाळी १०.३५ वाजता ३.३ रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. सदरच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. जळगाव जिल्ह्यात ३.३ रिश्टर स्केल या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे. काही महिन्यांपूर्वी पालघरला असेच भुकंपाचे धक्के बसले होते. महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रमाण वाढत असल्याने महाराष्ट्र भूकंपप्रवण क्षेत्रात आहे का? असा प्रश्‍न आज इंटरनेटवर सर्वाधिक सर्च होत आहे. यामुळे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

bhukamp bhusawal jpg webp webp

GSHAP डेटानुसार, महाराष्ट्र राज्य मध्यम ते उच्च भूकंपाच्या धोक्याच्या प्रदेशात येते. २००२ च्या भारतीय मानक ब्युरो (BIS) नकाशानुसार, महाराष्ट्र देखील झोन II, III आणि IV मध्ये येतो. ऐतिहासिकदृष्ट्या, या राज्याच्या काही भागांनी M6 मध्ये भूकंपाची क्रिया अनुभवली आहे.

---Advertisement---

ज्वालामुखी स्फोट अथवा सुनामीमुळे जमीनीखाली लाव्हारस, राख, पर्वत आणि विविध प्रकारचे वायू निघाल्यामुळे त्या ठिकाणी शून्याची स्थिती तयार होते. तो भरण्यासाठी झालेल्या भूगर्भिय घटनांमुळे पृथ्वी हलते. त्यातून उत्पन्न होणारे कंपन म्हणजे भूकंप. याबरोबर भूगर्भातील विविध वायू आणि पर्वतातील बदल होतो. त्यांच्यातील जोराच्या धडकेमुळे बल तयार होते आणि त्यातून मोठा धक्का बसतो. ज्या केंद्रस्थानी तो बसतो त्याला केंद्रबिंदू आणि ज्या ठिकाणी जाणवतो त्याला भूकंपक्षेत्र संबोधले जाते. भूकंपाच्या मानवी कारणांमध्ये खाणकाम हे प्रमुख मानले जाते. भारत आणि अन्य काही देशांमध्ये कोळसा, अ‍ॅल्युमिनियम, पेट्रोलियम पदार्थ, ग्रेनाइड आणि अन्य काही खनिज पदार्थांसाठी उत्खनन केले जाते. यासाठी मोठे स्फोट घडविले जातात. उत्खननामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी भूगर्भात तीव्र कंपने होतात. स्फोट हे त्याचे प्रमुख कारण असून वायू आणि भूगर्भातील द्रव पदार्थाची गती त्यामुळे वाढते.

महाराष्ट्रातील मोठे भूकंपाचे झटके
२९ सप्टेंबर १९९३ लातूर, उस्मानाबाद, किल्लारी- ६.२ रिश्टरस्केल; ११००० मृत्यू
१२ नोव्हेंबर १९९३ लातूर ४.६
१४ मार्च २००५ कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा ४.९
१५ मार्च २००५ ढेबेवाडी ४.३
१३ ऑगस्ट २००५ राज्यात अनेक ठिकाणी ४.४.
३० ऑगस्ट २००५ आंबेघर, डिचोली, किसरुळे ४.७
६ नोव्हेंबर २००७ सातारा ४.४
१६ नोव्हेंबर २००८ राज्यात अनेक ठिकाणी ५.०
१२ डिसेंबर २००९ सातारा ५.१
१ फेब्रुवारी २०१९ पालघर ३.६
२४ जुलै २०१९ ३.८

भूकंपादरम्यान काय करावे?
जमिनीवर पडा, मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा. जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या. तुम्ही एखाद्या जागेच्या आतमध्ये धक्के बसणे बंद होईपर्यंत आतच राहा. भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरूममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.

भूकंपानंतर काय करावे?
रेडिओ/टि.व्ही. वरून मिळणार्‍या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा. पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरू असल्यास बंद ठेवा. बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या. जर काही व्यक्ती जमिनीत गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---