जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील गिरणा नदी पत्रातील गट नं. 105 ते 108 दरम्यान,वाळूचा अमाप उपसा झाल्याचा आरोप एड.विजय भास्करराव पाटील यांनी केला होता. याबाबत त्यांनी प्रशासनाला तक्रार दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने खनिकर्म शाखेचे उपजिल्हाधिकारी यांनी ६ अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. पथकाकडून उद्या दि.२८ रोजी सकाळी आठ वाजता पथकाकडून प्रत्येक्षात तपासणी व मोजणी केली जाणार आहे.
मोजे वैजनाथ ता. एरंडोल जि. जळगाव येथील गट नं. १०५ ते १०८ लगतच्या गिरणा नदीपात्रातील वाळ/ रेतीगटांची तपासणी व मोजणी करण्याकामी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा बाळ सनियंत्रण समिती यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिक्षक अभियंता, भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक, गिरणा पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे भूवैज्ञानिक, प्रदूषण नियंत्रक मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचे पथक तयार केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मौजे वैजनाथ येथील गट नं.१०५ ते १०८ लगतच्या गिरणा नदीपात्रातील वाळू/रेतीगटांची उद्या दि.२८ मे ला सकाळी आठ वाजता तपासणी व मोजणी केले जाणार आहे. पथकातील संबंधितांना तपासणीचे व मोजणीचे साहित्य व आवश्यक लेखासह घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आले आहे.