जळगाव पोलीस दलात मोठे फेरबदल; १२ अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या, कोणाची कुठे बदली?

जून 16, 2026 5:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्ह्यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१’ मधील कलम २२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Police Bharati 2022

सामान्य पदावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जनहित, प्रशासकीय गरज आणि जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे अधिकृत आदेशात नमूद करण्यात आले आहे. या बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांना रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे, तर काहींना त्यांच्या विनंतीनुसार सध्याच्या पदावर मुदतवाढ मिळाली आहे.

कोणाची कुठे झाली बदली?

पोलीस निरीक्षक विशाल प्रभुलाल जयसवाल: रावेर पोलीस ठाण्यावरून जळगाव येथील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावर नियुक्ती.
पोलीस निरीक्षक मधुकर धांडोबा साळवे: जळगाव शहर पोलीस ठाण्यावरून रामानंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून बदली.
पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार: वरणगाव पोलीस ठाण्यावरून पाचोरा पोलीस ठाण्यात बदली.
पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील: रावेरहून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रिक्त पदावर नियुक्ती.
पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन हबीब सैय्यद: फैजपूरहून यावल पोलीस ठाण्यात बदली.
पोलीस उपनिरीक्षक कुणाल प्रमोद चव्हाण: चाळीसगाव ग्रामीणवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती.
भगवान काशिनाथ शिरसाठ: चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्ती.
भरत हरिभाऊ दाते: चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती.

‘या’ अधिकाऱ्यांना मिळाली मुदतवाढ:

सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) एकनाथ मच्छिद्र भिसे: १ वर्षाची मुदतवाढ.
पोलीस उपनिरीक्षक (PSI) विकास दादाजी शिरोळे: मेहुणबारे पोलीस ठाण्यात १ वर्षाची मुदतवाढ.
पोलीस उपनिरीक्षक (PSI) पूजा संजीवनी अंधारे: भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात १ वर्षाची मुदतवाढ.
पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रिया रमेश दातीर: शनिपेठ पोलीस ठाण्यात १ वर्षाची मुदतवाढ.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now