जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजची गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट

एमसीबी, ईव्ही चार्जर्स आणि विविध उत्पादन प्रक्रियांची घेतली प्रत्यक्ष माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, जळगाव येथील विद्यार्थिनींसाठी गोदावरी इंडस्ट्रीज आणि टेक्नोडिया इंडस्ट्रीज येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. वर्गात मिळवलेल्या सैद्धांतिक ज्ञानाची प्रत्यक्ष औद्योगिक कामकाजाशी सांगड घालणे, विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढविणे आणि औद्योगिक क्षेत्रातील करिअरच्या संधींची ओळख करून देणे, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.या भेटीदरम्यान विद्यार्थिनींनी विविध उत्पादन प्रक्रियांची प्रत्यक्ष पाहणी केली.

गोदावरी इंडस्ट्रीजमध्ये इलेक्ट्रिकल एमसीबी (चउइ) निर्मिती, विविध घटकांचे उत्पादन, असेंब्ली आणि वेल्डिंग प्रक्रियेची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच पिव्होट पिन असेंब्ली, थर्मल लाईन आणि मॅग्नेटिक लाईनवरील घटकांच्या निर्मिती प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देताना ईव्ही चार्जर्सचे उत्पादन तसेच चारचाकी वाहनांसाठी एसी टू डीसी चार्जर्सच्या निर्मिती प्रक्रियेचीही माहिती विद्यार्थिनींनी जाणून घेतली. प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेचे निरीक्षण केल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील तांत्रिक बाबी आणि कामकाजाची पद्धत समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली.

यावेळी गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजचे प्लांट डायरेक्टर श्री. चेतन नारखेडे, प्लांट हेड श्री. प्रविण येवले आणि सुपरवायझर श्री. हर्षल सोनवणे यांनी विद्यार्थिनींना विविध उत्पादन प्रक्रिया आणि तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींच्या प्रश्नांचे निरसन करून त्यांना मोलाचे मार्गदर्शनही केले.या औद्योगिक भेटीचे आयोजन महाविद्यालयाच्या इंडस्ट्रियल इंटरॅक्शन अँड व्हिजिट कमिटीच्या समन्वयक प्रा. मानसी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणाचा अनुभव मिळाला असून, त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात आणि तांत्रिक समजुतीत मोलाची भर पडली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button