गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात उद्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’आयोजन

जून 20, 2026 3:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोदावरी फाउंडेशन संचलित जळगाव येथील विविध वैद्यकीय व शैक्षणिक महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने उद्या २१ जून २०२६ रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

gadavari yog day

या वर्षी जागतिक स्तरावर (उत्कृष्ट आरोग्यासह वृद्धत्व आणि योग) या मुख्य संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या वयात उत्तम आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी योगाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे दिनांक: २१ जून २०२६ सकाळी ठीक ०६:०० वाजता सारा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज परिसर जळगाव येथे गोदावरी फाउंडेशन परिवारातील खालीलडॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव. डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव. डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव.डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव.डॉ. केतकी पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव प्रमुख महाविद्यालयांचे डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

विविध योगासनांचे प्रात्यक्षिकया सामूहिक योग साधना शिबिरात तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक केले जाईल. गोदावरी फाउंडेशनच्या वतीने या योग दिनाचे अतिशय भव्य नियोजन करण्यात आले असून, संस्थेच्या प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now