महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२१ । जळगाव महानगरपालिकेत ऐन दिवाळीत अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून प्रमुख पदावरील चार अधिकाऱ्यांची जबाबदारी बदलण्यात आली आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुशील साळुंखे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागेवर अभियंता गाेपाळ लुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाखा अभियंता उदय पाटील यांच्याकडे प्रभाग समिती ४ च्या प्रभाग अधिकारी पदाची जबाबदारी आता त्यांच्याकडे प्रभाग समिती २ चे प्रभाग अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर बांधकाम विभागाचे प्रभारी शहर अभियंता अरविंद भाेसले यांच्या जागेवर विलास साेनवणी यांची नियुक्ती करण्यातआली आहे. अरविंद भाेसले यांच्यावर प्रभाग समिती ४ चे प्रभाग अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यालय अधीक्षक व प्रभाग समिती २ चे प्रभाग अधिकारी राजेंद्र पाटील यांची ग्रंथपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयातील ग्रंथपाल मनिराम डाबाेरे यांच्याकडे प्रभाग समिती १ च्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.