⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरनल हॅकेथॉन स्पर्धा उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरनल हॅकेथॉन स्पर्धा उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२४ । एआयसीटीई आणि मिनीस्ट्री ऑफ एज्युकेशन द्वारे सुरू केलेला स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४ राष्ट्रीय उपक्रम स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकीत उत्साहात पार पडली.

यात टीम अ‍ॅग्रीकल्चर विजेते ठरले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. हेमंत इंगळे, प्रमुख पर्यवेक्षक शितल पाचपांडे (सीनियर सॉफ्टवेअर ट्रेनर, सोफ्टेड कॉम्प्युटर्स), अशफाक शेख, (सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टेड कॉम्प्युटर्स), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख) हे पर्यवेक्षक म्हणून तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविकात डॉ. अतुल बर्‍हाटे स्मार्ट इंडिया याबद्दल सविस्तर माहिती, स्पर्धेचा उद्देश्य विद्यार्थ्यांना सांगून राष्ट्रीय स्तरावरील समस्यांचे निराकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी आहे असे नमूद केले. त्यामध्ये असलेल्या सर्व थीम्स बद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे सादरीकरण बद्दल मार्गदर्शन केले.त्यानंतर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या एकूण २८ टीम सहभागी होवून विद्यार्थ्यांनी त्यांचे सादरीकरण केले. सादरीकरण दरम्यान पर्यवेक्षकानी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले तसेच काही चांगल्या सूचनाही दिल्या. विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत प्रशस्तीपत्रक तसेच रोख रक्‍कम बक्षीस देण्यात आले. व पुढील फेरीसाठी १७ वेगवेगळ्या टीम्स ची निवड करण्यात आली.

समारोपप्रसंगी सौ.शितल पाचपांडे तसेच प्रा. महेश एच पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केलेल्या सादरीकरण बद्दल कौतुक केले व व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सूचना केल्या व पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.विजेते स्पर्धक प्रथम क्रमांक दिपाली सुरासे, दीक्षा पाटील, भूमिका भाटे, श्वेता बोरसे, निलाक्षी बर्डे, सिद्दिकी मोहम्मद तल्हा यांच्या टीम – एग्रीकल्चरने मिळवला तर अक्षता भोळे, महेंद्र मिस्त्री,गणेश राज पाटील,प्राची गिरासे,श्रुती देशमुख, हिमांशू पाटील यांच्या टीम – द हॅक कोडर आर्मी द्वितीय क्रमांक आणि नम्रता संगेले,भावेश पाटील,करिष्मा तांबट,सागर माळी,कोमल अकोले, प्राची पोलभूने यांच्या टीम – नेचर्स नेव्हिगेटर तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रुती सोनार व जय खडसे तसेच या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमा साठी विभागनिहाय प्रोजेक्ट इन्चार्ज प्रा.सचिन महेश्री, प्रा.निलेश चौधरी, प्रा. किशोर महाजन व प्रा. विजय चौधरी, प्रा. प्रशांत शिंपी व प्रा.देवपाल यादव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी डॉ. अतुल बर्‍हाटे, प्रा. महेश पाटील(विद्युत विभाग प्रमुख), डॉ.हेमंत इंगळे(अधिष्ठाता), डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य) यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव) तसेच डॉ. केतकी पाटील (सदस्य) डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी) यांनी कौतुक करत स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्‍त केल्यात.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.