---Advertisement---
बातम्या

येत्या ४ महिन्यात सर्व रस्त्यांची कामे पुर्ण करण्याचा मानस – गिरीश महाजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : ७ एप्रिल २०२३ : जळगाव शहरातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर जळगावच्या रस्त्यांसाठी १०० कोटीचा निधीला मंजुरी आला होता. शहरातील नगरसेवकांनी शहराच्या रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील शासनाकडे निधीची मागणी केली होती.

GIRISH MAHAJAN 3 jpg webp

म्हणून या संदर्भात मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बैठक झाली होती. सदर बैठकीत चर्चा करून जळगाव शहरासाठी निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानुसार जळगाव शहरातील रस्त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील विविध प्रभागांमधील रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

---Advertisement---

या निधीतून रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आल्यामुळे जळगाव शहरातील नागरिकांचा प्रवास हा सुकर होणार आहे. सदर निधीतील कामे तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी अधिकाऱ्यांना सुचना केल्या असून येत्या ४ महिन्यात सर्व रस्त्यांची कामे पुर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.

सदर कामांसाठी देशभरातून निविदा मागविण्यात येणार असून सक्षम अश्या मक्तेदाराला हा मक्ता दिला जाणार आहे. तसेच सदर रस्त्यांची कामे गुणवत्ता पुर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी गुणवत्ता तपासणी कडे लक्ष देवून कामे करून घ्यावेत अशा सुचना देखील ना. गिरीष महाजन यांनी केल्या आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रीगिरीष महाजन, आ.सुरेश भोळे यांनी जळगाव शहरासाठी निधी मिळवून दिल्याबद्दल भाजप नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकत्यांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी देखील रस्त्यांची कामे होणार असल्यामुळे समाधान व्यक्त केले

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---