---Advertisement---
रावेर

रावेरच्या तत्कालीन पुरवठा निरीक्षकांची पुढील आठवड्यापासून चौकशी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । जिल्हाभरात गाजलेल्या रावेर पुरवठा विभागाच्या तत्कालीन पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्या चौकशीला येत्या आठवड्यात सुरुवात होणार असल्याचे प्रांतधिकारी कैलास कडलग म्हणाले.

शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्यांचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड तीन रुपयांप्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे या कारणावरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तत्कालीन पुरवठा निरीक्षकांची बदली करून कर्तव्यात कसूर कोणी केला? याकडे लक्ष लागले आहे.

---Advertisement---

या प्रकरणाच्या निष्पक्षपातीपणे चौकशीसाठी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक हे चौकशी अधिकारी आहेत. आता या प्रकरणाची  येत्या आठवड्यापासुन चौकशीला सुरुवात होणार आहे. तालुक्यात सर्वाधिक चर्चेला जाणारे या प्रकरणाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---