महाराष्ट्रात मान्सूनची दमदार एन्ट्री; जळगावला ऑरेंज अलर्ट, पाहा कुठे कोणता अलर्ट

मे 27, 2025 10:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२५ । महाराष्ट्रात मान्सूनने दमदार एंट्री घेतली असून कोकणसह पुणे घाटमाथा आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आज २७ मे देखील हवामान खात्याने राज्यात पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विशेष आज जळगाव जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

rain jpg webp

सोमवारी सकाळपासून जळगाव शहरात तापमान वाढले होते. पारा ३९ अंशांपर्यंत पोहोचला. तसेच आर्द्रता जास्त असल्याने दुपारी उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. अशात दुपारी चार वाजता ढगाळ वातावरण होऊन पाऊस (०.१ मिमी) झाला.किमान पंधरा मिनिट पाऊस झाल्याने काहीसा गारवा निर्माण झाल्याने जळगावकरांना उकाड्यातून दिलासा मिळाला. मात्र आज जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यंदा जिल्ह्यात पाऊस सप्टेंबरअखेर वा ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत राहील, अशी शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.

दरम्यान मुंबई सह पुण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जळगाव, भुसावळहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून जळगाव, भुसावळला येणाऱ्या काही गाड्या उशिराने धावल्या. यात अप मार्गावरील ६ तर डाऊन मार्गावरील ८ गाड्यांचा समावेश आहे. यामुळे प्रवासी विविध रेल्वे स्थानकावर ताटकळले होते.

आज कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
रेड अलर्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाटमाथा.
ऑरेंज अलर्ट : रायगड, पुणे घाटमाथा, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड.
येलो अलर्ट : ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली, नंदूरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment