जळगाव जिल्हावाणिज्य

Gold Rate : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जळगावच्या सुवर्णपेठेत सोने-चांदीचा भाव वाढला, आताचे भाव पहा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२५ । आज साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. मात्र सोने खरेदीचा मुहूर्त साधणाऱ्या ग्राहकांना खिशाला मोठी कात्री बसणार आहे. कारण अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या भावात ८०० रुपयांनी वाढ झाली. तर चांदी १००० रुपयांनी वाढली.

gold silver 1 jpg webp

अमेरिकन टेरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी चढ-उतार पाहण्यास मिळाली. जळगावच्या सराफ बाजारात यंदा सोन्या आणि चांदीचे दर लाखांवर पोहचले आहे. मात्र मागच्या काही दिवसात त्यात घसरण दिसून आली. काल झालेल्या दरवाढीनंतर सध्या जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६,६०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदी ९८ हजार रुपये किलो असा भाव होता.

सोने गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा प्रतितोळा तब्बल २० हजार रुपयांपेक्षा महागले आहे. गेल्या वर्षी सोने ७६ हजार ७०० रुपये भाव होता. सध्या सोने ९६ हजार ६०० रुपये प्रति तोळा आहे. जीएसटीसह एक तोळे सोने घेण्यासाठी ९९ हजार ४९८ रुपये मोजावे लागत आहेत, यात घडणावळ खर्च वेगळा असतो. तसेच चांदीचे भाव ९८ हजार रुपयांवर असून एक किलो चांदीसाठी जीएसटीसह एक लाख ९४० रुपये मोजावे लागत आहेत.

सोने-चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढतच असून आता तर तोळाभर सोने असो की किलोभर चांदी घ्यायची झाल्यास एक लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागत आहे. त्यात आता सुवर्ण खरेदीचा मोठा मुहूर्त असलेली अक्षय्य तृतीयादेखील असल्याने या दिवशी सोने-चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ शकते असा सराफ व्यवसायिकांचा अंदाज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button