⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज| ९ ऑगस्ट २०२३। जळगाव शहरातील सागर नगरात भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मंगळवार ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की. गौतम वना सावळे (वय 40 रा. आंबेडकर नगर खेडी बुद्रुक ता.जि.जळगाव) हा तरुण त्याचा मित्र बापू रामा सोनवणे यांच्यासोबत सोमवारी ७ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सागर नगरातून ज्ञानदेव नगरकडे जाणाऱ्या रोडवरून दुचाकीने जात होते. त्यावेळी समोरून येणारे विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडकअ दिली. या धडकेत गौतम सावळे आणि बापू सोनवणे हे दोघे जखमी झाले.

या अपघाता नंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. दरम्यान या प्रकरणी गौतम सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मराठे करीत आहे.