जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । यावल आणि रावेर तालुक्यात केशवस्मृती प्रतिष्ठान आणि ग्लोबल सिनर्जाइझर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या पोषण अभियानात १९७ गरजू आणि आदिवासी पाड्यावरील महिलांना पोषण किटचे वितरण करण्यात आले असून, यात गरोदर तसेच स्तनदा मातांचा समावेश होता.
सविस्तर असे की, यावल आणि रावेर या दोन तालुक्यातील मालोद, वाघझीरा, मानापुरी, गायरान, इचखेडा, खालकोट, कोळवद, डोंगरदे, रावेर, आभोडे या गावात पोषण किटचे वितरण करण्यात आले. किटमध्ये सोयाबीन वडी, सातू पीठ, नाचणी पीठ, तूर, मसूर, मूग या डाळींचे एकत्रित पीठ व एक किलो खजूर अशा वस्तूंचा समावेश हाेता. किट वितरणप्रसंगी हे तयार करण्याची रेसिपीही समजावून सांगण्यात आली. तसेच अभियानास त्या-त्या गावातील अंगणवाडी सेविकांचे सहकार्य लाभले.
यांचे सहकार्य लाभले
या अभियानासाठी चाईल्ड लाईनचे समन्वयक भानुदास येवलेकर, समुपदेशिका वृषाली जोशी, टीम सदस्य कुणाल शुक्ल, रोहन सोनगडा, संजीवनी सावळे, प्रसन्न बागल, सामाजिक कार्यकर्ते चैताली पाटील, शिवानी महाजन, नेहा कारोसिया यांचे सहकार्य लाभले.