⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमानवीय : कुत्र्याला रॉडने मारले ; नंतर मालकरवरही केला हल्ला

अमानवीय : कुत्र्याला रॉडने मारले ; नंतर मालकरवरही केला हल्ला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरातून धक्कादायक छायाचित्रे समोर आली आहेत. ती म्हणजे कुत्र्याच्या भुंकण्याच्या रागातून एका व्यक्तीने शेजाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. कुत्र्याला रॉडने मारले त्यानंतर शेजाऱ्यांवरही म्हणजेच कुत्रीच्या मालकावर हल्ला केला.

त्यानंर आजूबाजूचे लोक घरातून बाहेर आले आणि हल्लेखोराला पकडून घेऊन गेले. या हल्ल्यात ३ जण जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याची छायाचित्रे थक्क करणारी आहेत. या घटनेनंतर रक्षितच्या (कुत्र्याचा मालक) जबाबावरून पश्चिम विहार पूर्व पोलिस ठाण्यात आयपीसी आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याने दोन्ही कुटुंबे समोरासमोर आली. द्वारकाचे पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी सांगितले की, जितेंद्र पांडे आणि विनोद कुमार यांचे कुटुंब डाबरी भागात राहतात. विनोदच्या घरात एक कुत्रा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद रविवारी आपल्या कुत्र्यासोबत फिरायला गेला होता. जितेंद्र पांडे याने कुत्र्याला पाहिल्यानंतर कुटुंबीयांना बोलावून विनोदशी वाद घालण्यास सुरुवात केली. विनोदने विरोध केला असता त्याला मारहाण करण्यात आली. यादरम्यान विनोदची पत्नी आणि मुलीलाही मारहाण करण्यात आली. या घटनेत विनोद, त्याची पत्नी व मुलगी जखमी झाले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह