हतनूर धरणात अद्यापही पाण्याची आवक सुरु
जळगाव लाईव्ह न्यूज । हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा अधिक पाऊस झाल्याने अजूनही आवक सुरु आहे. हतनूर धरण १० ऑक्टोबरला १०० टक्के भरल्यानंतरही आवक कायम आहे. सध्या धरणात १९२ क्युमेक्स अर्थात ६ हजार ७८१.४४ क्युसेक पाण्याची पाण्याची आवक होत आहे. ४ दरवाजे अर्धा मीटरने उघडून नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. हतनूर धरणात १० ऑक्टोबरला १०० टक्के जलसाठा करण्यात आला होता. यानंतरच्या काळात साधारणपणे आवक बंद होते. मात्र यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरु होता.
यामुळे धरणात तापी व पूर्णा या दोन्ही नद्यांमधून आवक सुरुच आहे. यामुळे १०० टक्के जलसाठा करून तापीनदीत प्रतीसेकंद ६ हजार ७८१ क्युसेक प्रतीसेकंद वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. हतनूर धरणातून दरवर्षी नोव्हेंबरमध्ये रब्बीसाठी पहिले आवर्तन दिले जाते. यंदा परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा राहणार आहे. यामुळे या आवर्तनाची उशिराने गरज भासेल. दरम्यान शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आवर्तन दिले जाणार आहे. विसर्ग वाढून तापीनदी पून्हा खळाळली आहे
कालव्यातून पूर्नभरण करावे
हतनूर धरणात अद्यापही पाण्याची आवक सुरु आहे. प्रशासनाकडून हे पाणी तापीनदीत विसर्ग करुन दिले जात आहे. या ऐवजी पाटबंधारे विभागाने हतनूरच्या उजव्या तट कालव्यातून पाणी वळवल्यास ते पूढे तापीनदीतच सोडले जाईल मात्र या प्रयोगामुळे पुनर्भरण होण्यास मदत होईल