जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, सरलेल्या जून महिन्यात अन्नधान्याचा महागाई दर १४.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो त्या आधीच्या मे महिन्यात १२.३४ टक्के होता. मुख्यतः अन्नधान्य, भाजीपाला, फळे आणि बटाटे आदींच्या किमती मागील वर्षांच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढल्याने महागाई दोन अंकी पातळीवर कायम आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
भाजीपाल्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एकूणच अन्नधान्याच्या महागाई दरात वाढ झाली. सरलेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती ५६.७५ टक्क्यांनी वाढल्या, तर बटाटे आणि फळांच्या किमतीत अनुक्रमे ३९.३८ टक्के आणि २०.३३ टक्के वाढ नोंदवली गेली. त्याचबरोबर गोल ऊर्जा घटकांमधील महागाई दर ४०.३८ देण्य टक्क्यांवर पोहोचला आहे. इंधन व नैसर्गिक त्यांन वायूमधील महागाई दर जूनमध्ये ७७.२९ भार टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढती महागाई आणि युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आहे. मंदीच्या ट्वेन भीतीने वस्तूंची मागणी आणि किमती कमी झाल्याने जून २०२२ मध्ये मासिक आधारावर खनिजे आणि मूलभूत धातूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे, असे ‘इक्रा’च्या अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या.
किरकोळ महागाई दरापाठोपाठ घाऊक महागाई दरही किंचित ओसरून जूनमध्ये १५.१८ टक्के नोंदविला गेला असला तरी, मागील १५ महिन्यांपासून सुरू असलेला त्याचा दोन अंकी उच्च स्तर कायम आहे. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती झपाट्याने कमी झाल्याने त्यात महिनागणिक नाममात्र घसरण दिसत असली तरी अजूनही अन्नधान्य विशेषतः प्रथिनेयुक्त जिन्नसांच्या किमतींचा वरच्या पातळीवर जोर कायम आहे.