जळगाव लाईव्ह न्युज | सुभाष धाडे | मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर-जुने घोडसगाव रस्त्यावर मुक्ताईनगर येथील बऱ्हाणपूर रसत्यापासुन १ कि.मी अंतरावर वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या एका बाजुकडील स्लॅब बाहेर आला असून स्लॅबमधील लोखंडी सळई बाहेर आल्या आहेत. यामुळे तालुक्यात होत असलेल्या कामांबाबत जनमाणसांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सा.बा उपविभागीय अभियंता यांनी सदर प्रकाराला दुजोरा देतांना सांगितले की,पुलावरील नव्हे तर पुल व रस्त्याच्या जाॅईंडवरील स्लॅब उकरला गेल्याने लोखंडी सळई बाहेर आलेल्या आहेत. लवकरच रिपेअरींगचे काम करण्यात येणार असल्याचे ‘जळगाव लाईव्ह न्युज’ च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
सदर रस्त्यावरुन शेतकऱ्यांसह कुऱ्हा परीसरातील नागरिकांची ये-जा असते परीसरातील चिमणी भट्टे यांच्या मालाची अवजड वाहतुक चालते. एखादेवेळी वाहन पुलात रुतुन पुलाला मोठे भगदाळ पडु शकते. एखादा अपघात या ठिकाणी होऊ शकतो अशी भीती वाहनचालकांना आहे.मात्र याचे गांभीर्य कुणाला? तालुक्याला एक खासदार व दोन आमदार असतानासुद्धा खालच्या दर्जाची निकृष्ट पद्धतीने कामे होत असल्याने जबाबदार अधिकारी वर्ग करतो तरी काय? लोकप्रतीनिधींनी तालुक्यात सुरु असलेल्या कामांवर लक्ष द्यावे अशी अपेक्षा जनतेची आहे.
बांधकामात निकृष्टतेने गाठला कळस! ; वर्षभरातच पुलाच्या स्लॅबमधील सळई बाहेर
Updated On: एप्रिल 26, 2023 6:57 pm

---Advertisement---