⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाची रेमंड कंपनीला औद्योगिक अभ्यास भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२४ । गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाची औदयोगिक अभ्यास भेटीचे आयोजन जळगाव येथील सुप्रसिद्ध रेमंड प्रा. लि. या औद्योगिक संस्थेत करण्यात आले.

मैनेजमेंट शाखेतील विद्यार्थ्यानी व प्राध्यापकांनी रेमंड येथील प्लाटचे अवलोकन व परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी तांत्रिक कर्मचारी व व्यवस्थापकांशी चर्चा करुन त्यांच्या शंकांचे निराकारन केले. या औदयोगिक संस्थेचे सहकारी यांनी दैनंदिन कामकाज व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया व उलाढाल याविषयी माहिती दिली. यावेळी प्रा. योगिता घोंगडे, प्रा. मिताली शिंदे, प्रा.तेजल पाटील, प्रा. प्रशांत बाहेकर, विद्याधर इंगले सर उपस्थित होते