जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । गेल्या २२ महिन्यापासून बंद असलेली भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत. नुकतेच भुसावळवरून सुटणाऱ्या भुसावळ-पुणे (Bhusawal-Pune) हुतात्मा एक्स्प्रेससह (Hutatma Express) काही गाड्या सुरु करण्यासाठी भुसावळ डीआरएम कार्यालयाने जीएम कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. आता मुंबई मुख्यालयाकडून पुणे आणि साेलापूर विभागाला हुतात्मा एक्स्प्रेसचे डबे (बोगी) तयार ठेवावे, असे सांगितले. त्यामुळे १९ जानेवारीनंतर ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यातही आरक्षण असलेल्यानाच प्रवेश दिला जात होता. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. काही दिवसापूर्वीच रेल्वे प्रशासनाने भुसावळ-इगतपुरी, इटारसी व बडनेरा मार्गावर मेमू गाडी सुरू केली आहे. त्यापाठोपाठ १० जानेवारीपासून भुसावळ-देवळाली शटल ऐवजी भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी सुरु झाली.
त्यानंतर गेल्या २२ महिन्यापासून बंद असलेली भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी सुरु करण्याची मागणी होत आहे. मध्यंतरी मनमाड, दाैंडपर्यत ही गाडी आठवडाभर चालवली होती. मात्र, नंतर तिला पुन्हा ब्रेक लागले. मात्र, प्रवाशांकडून होणारी मागणी पाहता ही गाडी पुढील आठवड्यात सुरू होण्याचे संकेत मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेे. प्रशासनाने साेलापूर व पुणे विभागाला हुतात्मा एक्स्प्रेसचे डबे तयार ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी साेलापूर-पुणे अशी धावते. तिलाच पुणे-भुसावळ नावाने भुसावळपर्यंत वाढवल्याने भुसावळातून पुण्याला जाणाऱ्यांची सोय होते. दरम्यान, या तयारीबाबत येथील अधिकारी अनभिज्ञ असले तरी पुणे, साेलापूर येथील अधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला.
हे देखील वाचा :
- जळगावातील अधिक्षक डाकघर येथे 06 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन
- ‘जागतिक एड्स डे’ निमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना
- सर्वसामान्यांना दिलासा ! दिवाळीत महाग झालेला किराणा झाला स्वस्त..
- भारतीय हवाई दलात 12वी ते ग्रॅज्युएट्स पाससाठी मोठी संधी; तब्बल एवढ्या जागांवर भरती?
- डीसीएस मोबाईल अॅपद्वारे होणार रब्बीतील नवीन ई-पीक पाहणी