जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२३ । आत्तापर्यंत तुम्ही मोबाईलवर येणाऱ्या सरकारी मेसेजकडे दुर्लक्ष करत असाल, तर महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे. सरकारने इंडियन वायरलेस टेलिग्राफी नियम, 2023 अंतर्गत काही अनिवार्य नियम आणले आहेत. आजपासून नवे नियम लागू झाले आहेत. तोपर्यंत सरकारकडून मोबाईलवर पाठवलेल्या संदेशाचा अलर्ट किमान ३० सेकंद वाजेल. तसेच, पाठवलेला संदेश वाचल्याशिवाय, आपण स्क्रीनवर काहीही करू शकणार नाही. कारण जोपर्यंत मेसेज वाचला जात नाही तोपर्यंत तो मेसेज स्क्रीनवरून हटवला जाणार नाही.
विशेष बाब म्हणजे फोन आपत्तीचा इशाराही वाचेल. भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने भारतीय वायरलेस टेलिग्राफी (आपत्ती सूचनांसाठी सेल ब्रॉडकास्टिंग सेवा) नियम, 2023 जारी केले आहेत. हे नवीन नियम आजपासून लागू होणार आहे.
नियम काय म्हणतो?
प्रत्येक फोनवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये संदेश प्रसारित करणे अनिवार्य केले आहे
स्मार्टफोन असो किंवा फीचर फोन, त्यावर संदेश दिसला पाहिजे.
अशा संदेशांसाठी 30 सेकंदांसाठी प्रकाश, ध्वनी आणि कंपन अनिवार्य झाले आहे.
फोनमध्ये किमान 24 तास अलर्ट मेसेज राहायला हवा
हा मेसेज जोपर्यंत वापरकर्त्याने तो पाहिला आणि मान्य केला नाही तोपर्यंत तो स्क्रीनवर राहील.
फोनच्या वैशिष्ट्यांच्या सूचीमध्ये प्रसारणासाठी स्वतंत्र श्रेणी
सूचना संदेश ऑडिओ संदेश म्हणून देखील प्ले होतील