---Advertisement---
वाणिज्य

पोस्टाची लयभारी योजना : केवळ १०० रुपयांची गुंतवणूक करा, ५ लाख मिळतील

post office
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ ।  गुंतवणुकीसाठी प्रत्येक जण सुरक्षित असा पर्याय शोधत असते. बऱ्याचदा आपल्याला गुंतवणुकीची चिंता सतावत असते. कुठल्या योजनेत गुंतवणूक करायची, याचाच विचार आपण करत असतो, काही जण बँकेत गुंतवणूक करणाऱ्या प्राधान्य देतात. पण पोस्टातही गुंतवणूक करणं हे जास्त फायद्याचं असतं. अशात अशी एका योजना आहे जेथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि व्याज दर देखील चांगला मिळतो.

post office

भारतीय पोस्ट कार्यालयाच्या रिकरिंग डिपॉझिट अकांऊट मध्ये तुम्ही स्वत:ची गुंतवणूक सुरक्षित ठेऊ शकता आणि त्यावर तुम्हाला चांगला व्याज दर देखील मिळतो. या खात्यात तुम्ही दिवसाला १०० रुपये गुंतवल्यास ५ लाखापर्यंत परतावा मिळू शकता. जाणून घेऊयात पोस्ट खात्यातील या योजनेबद्दल…

---Advertisement---

रिकरिंग डिपॉझिट अकांऊट हे एक प्रकारचे एफडी खाते आहे. मात्र याठिकाणी गुंतवणुक अधिक फायद्याची आहे. एफडीमध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. तर आरडीमध्ये तुम्हाला एसआयपी प्रमाणे वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंटमध्ये महिन्याच्या महिन्याला गुंतवणूक करता येते. यामध्ये तुमच्या खात्यामध्ये व्याज तिमाही आधारावर कंपाउंडिंग होऊन जोडले जाते.

पोस्टाच्या या खात्यात तुम्ही जमा केलेल्या रक्कमेवर ५.८ टक्के इतके व्याज मिळते. पोस्टाची ही योजना शेअर बाजाराशी लिंक नसते त्यामुळे यातील गुंतवणूक सुरक्षित असते. तुम्ही पैसे गुंतवले तर निश्चितपणे तुम्हाला परतावा मिळतो.

पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट अकांऊट चक्रवाढ दराने व्याज मिळते. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी जितका अधिक तितका फायदा अधिक. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करताना मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरते. या योजनेची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्ही महिन्याला १०० रुपयांपासून पैसे जमा करू शकता. दहाच्या पटीत तुम्ही पैसे जमा करू शकता. जास्ती जास्त किती पैसे गुंतवायचे याला मर्यादा नाही.

१०० रुपयांचे ५ लाख कसे कराल

या योजनेतून तुम्हाला ५ लाख इतका परतावा मिळवायचा असेल तर १० वर्षासाठी प्रत्येक दिवशी १०० रुपये जमा करावे लागतील. या हिशोबाने प्रत्येक महिन्याचे ३ हजार होतील. प्रत्येक ३ महिन्याचे व्याज आणि १० वर्षाची गुंतवणूक जवळपास ३.६० लाख रुपये इतकी होती. यावर १.४० लाख व्याज मिळते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---