---Advertisement---
नोकरी संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात तरुणांसाठी नोकरीची संधी! दरमहा 1 लाखापर्यंत पगार मिळेल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय सैन्य दलात भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे, भारतीय सैन्याने NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2025 अंतर्गत भरती जाहीर केली असून या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 15 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. Indian Army Recruitment

indian army

रिक्त पदाचा तपशील: Indian Army Bharti
NCC स्पेशल एंट्री (पुरुष) – 70
NCC स्पेशल एंट्री (महिला) – 06

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता आणि अन्य अटी
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी.
अंतिम वर्षात शिकणाऱ्या उमेदवारांनाही अर्ज करता येईल, परंतु त्यांच्या मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 50% गुण अनिवार्य आहेत.
उमेदवाराने किमान दोन वर्षे NCC मध्ये सेवा दिली असावी आणि त्याच्याकडे वैध NCC प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय 19 ते 25 वर्षांदरम्यान असावे.
परीक्षा शुल्क : अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
नोकरीचे ठिकाण
उमेदवारांची भारतभर विविध सैन्य ठिकाणी नियुक्ती केली जाईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
15 मार्च 2025, दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---