जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । जिल्ह्यात नेहमी रस्त्यावर राहून कोरोना योद्धाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पोलीस मुख्यालय परिसरात ऑक्टोबर महिन्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. परंतु रुग्णसंख्या कमी असल्याने ते बंद करण्यात आले होते. पुन्हा कर्मचारी बाधित होऊ लागल्याने ४० जणांची व्यवस्था असलेले सुसज्ज कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली. कोविड सेंटरमध्ये मनोरंजनाची साधने, कुलर, शुद्ध पाणी यासह इतर अनेक सुविधा असल्याचेही ते म्हणाले.
पहा लाईव्ह व्हिडीओ :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/267109714902062/