जळगाव । येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्यदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य), तसेच गोदावरी फाउंडेशन अंतर्गत असणार्या सर्व महाविद्यालयाचे मान्यवर उपस्थीत होते.
स्वातंत्र्य दिनी गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या वतीने देशभक्तीपर गीत व नृत्याविष्कार तसेच देशभक्तीपर भाषणे सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नवकल्पनांचे सादरीकरण केले. त्यामध्ये त्यांनी नवभारत निर्मिती, ऑलम्पिक, समृद्ध भारत, या विषयांवर मते मांडली. त्याचप्रमाणे संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून उत्कृष्ट गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नृत्य याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता.त्यानंतर डॉ. केतकी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक असतो जेणेकरून त्याची गुणवैशिष्ट्य सादर करण्याचे संधी मिळते. स्वातंत्र्यदिनी सादर करण्यात आलेल्या कलाकृतीचे त्यांनी कौतुक केले.स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच डॉ.उल्हास पाटील विधी कॉलेज, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इन्स्टिट्यूट, हरिभाऊ जावळे हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल व इतर संस्थांचे प्राध्यापक वर्ग व मान्यवर उपस्थित होते.