---Advertisement---
बातम्या

तळेगाव येथे तब्बल ‘११’ वर्षांनी साजरा झाला स्वातंत्र्य दिन

---Advertisement---

 

Untitled design 1 2 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ ।तालुक्यातील तळेगाव तांडा येथील प्रबोधनकार ठाकरे आश्रम शाळा प्रदिर्घ काळानंतर परत मिळाल्याने प्रथमच 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

---Advertisement---

चाळीसगाव तालुक्यातील दिनदुबळ्यांना शिक्षण घेता यावे या सामाजिक भावनेतून प्राणीमित्र इंदल चव्हाण यांच्या अथक परिश्रमातून सन 1986 मध्ये महाराष्ट्रातील पहीली प्रबोधनकार ठाकरे आश्रम शाळा तळेगाव तांडा (कृष्णनगर) येथे स्थापण करण्यात आली. त्यानंतर तब्बल १५ वर्ष विनाअनुदानित तत्त्वावर शाळा चालवून सन १९९९ साली त्याला मान्यता देण्यात आली. परंतु राजकीय कटकारस्थाने कालांतराने मान्यता हि काढून घेण्यात आली. दरम्यान प्राणीमित्र इंदल चव्हाण यांनी २५ वर्ष न्यायालयीन लढाई लढून त्यांनी नुकतीच ती संस्था परत मिळवली आहे. त्यामुळे ११ वर्षांनंतर प्रथमच या संस्थेत 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारत माता, संत दगडूजी महाराज, प्रबोधनकार ठाकरे , संत सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ,बाबासाहेब आंबेडकर, स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, क्रांतिकारी भगतसिंग ,राजगुरू सुगदेव ,अदी महापुरशांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रत्यक्षात कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ध्वजारोहण जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ माऊली यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राणीमित्र इंदल चव्हाण यांनी आपल्या मनोगतात, आर्थिक दृष्ट्या कमकुवत व शिक्षणापासून वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणाची खरी ज्योत पेटवणार असल्याचे प्रतिपादन केले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नव्याने प्राथमिक आश्रम शाळेची मान्यता दिल्याने प्राणीमित्र इंदल चव्हाण यांनी आभार मानले. मान्यता मिळवून देण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाप्रसंगी काशिनाथ माउली, देवेंद्र डि. नायक ॲड. भरत चव्हाण व भिमराव जाधव यांनी आपल्या मनोगतातून प्राणीमित्र ईंदल चव्हाण यांच्या जिवण प्रवासाबद्दल सांगून भविष्यात हि आश्रम शाळा महाराष्ट्रातील आदर्श शाळा म्हणून नावरूपायाला येवोत अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

 

याप्रसंगी बंजारा ऐकीकरण समितीचे प्रमुख देवेंद्र डी. नायक, कांतिलाल राठोड ,चत्रू रूपसिंग राठोड, चिंतामण चव्हाण, माजी उपसरंपंच गोर्धन राठोड (तळेगाव), शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल राठोड, शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. भरत चव्हाण, सचिव भिमराव जाधव, पत्रकार योगेश्वर राठोड रूपसिंग जाधव , प्रमुख ग्रामस्थ मंडळी सरदार राठोड ,प्रभू चव्हाण ,भास्कर चव्हाण, आरूण चव्हाण, मोतीलाल चव्हाण, रावसाहेब चव्हाण, भुरसिंग ट्रेलर, ज्ञानेश्वर चव्हाण, छगन चव्हाण ( बंजारा शाहीर, कवी, ) ईश्वर राठोड बाळू चव्हाण, आदी उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अवी चव्हाण ,श्माम चव्हाण , कल्याण चव्हाण विनोद जाधव अदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमराव जाधव यांनी तर आभार गोर्धन राठोड यांनी मानले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---