⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाणी टंचाईची चिंता मिटली! जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात मोठी वाढ, कोणत्या धरणात किती जलसाठा?

पाणी टंचाईची चिंता मिटली! जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात मोठी वाढ, कोणत्या धरणात किती जलसाठा?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२४ । ही बातमी जळगावकरांसाठी दिलासा देणारी नक्कीच ठरेल. ती म्हणेज गेल्या काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सहा मध्यम धरणाच्या जलसाठ्याने शंभरी गाठली आहे. तर जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणासह गिरणा धरण देखील शंभरीच्या उंबरवठ्यावर आहे. यामुळे जळगावकरांची पाणी टंचाईची चिंता मिटली आहे.

जिल्ह्यात यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला; पण जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणांच्या जलसाठ्यात वाढ झालेली नव्हती. पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी यंदा जिल्ह्यातील अनेक धरणांतील जलसाठ्यात वाढ न झाल्याने चिंता अधिकच वाढली होती.

परंतु ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीलाच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. यात विशेष म्हणजेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पाचे ६ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर मोठे प्रकल्पातील दोन धरणे शंभरीच्या उंबरवठ्यावर आहेत.

जिल्ह्यातील धरणात बुधवारी (४ सप्टेंबर) सकाळपर्यंत ७०.८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष गतवर्षीपेक्षा यंदाच्या जलसाठ्यात २८ टक्क्यापर्यंतची वाढ दिसून आली. गेल्या वर्षी ४२.८६ टक्के जलसाठा होता. दरम्यान, गेल्या महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसात शून्यावर असलेल्या धरणातील जलसाठ्यात देखील मोठी वाढ झाली. सध्या जळगाव शहराला पाणीपुरवठा जाणारे वाघूर धरण ९५. ३९ टक्के भरले आहे. तर काही तालुक्यांना वरदान ठरणारे गिरणा धरण देखील ९६.०८ टक्के भरले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टक्के) (४ सप्टेंबरपर्यंत)
मोठे प्रकल्प
हतनूर – यंदा ३२.७१ टक्के – गतवर्षी ७३.४९
गिरणा – यंदा ९६.०८ टक्के – गतवर्षी – ३६.७८
वाघूर – ९५.३९ टक्के – गतवर्षी – ५७.३०

मध्यम प्रकल्प
अभोरा – यंदा १०० टक्के – गतवर्षी १०० %
मंगरूळ- यंदा १०० टक्के – गतवर्षी १०० टक्के
हिवरा – यंदा ३१.२७ टक्के – गतवर्षी ०० टक्के
सुकी – यंदा १०० टक्के – गतवर्षी १०० टक्के
मोर – यंदा ८८.०४ टक्के – गतवर्षी ७१.८७ टक्के
बहुळा – यंदा ३८.६३ टक्के – गतवर्षी ०६.७२ टक्के
अग्नावती – यंदा १०० टक्के – गतवर्षी ०० टक्के
तोंडापूर – यंदा १०० टक्के – गतवर्षी ४९.५५ टक्के
अंजनी – यंदा ३८.८७ टक्के – गतवर्षी ५५.७२ टक्के
गूळ – यंदा ६९.०५ टक्के – गतवर्षी ७६.४४ टक्के
बोरी – यंदा १०० टक्के – गतवर्षी १२.५० टक्के
मन्याड – यंदा ३९.१४ टक्के – गतवर्षी ०० टक्के
शेळगाव बॅरेज – यंदा ४१.१४ टक्के – गतवर्षी ०० टक्के

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.