जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । जर तुम्हीचेही खाते अॅक्सिस बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत बचत खात्यावरील सेवा शुल्कात वाढ केली आहे. याचा परिणाम सर्व ग्राहकांवर होणार आहे. बँकेचा हा नियम १ जूनपासून लागू होणार आहे. बँकेने खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादाही वाढवली आहे. जर तुम्ही वाढलेली शिल्लक ठेवू शकत नसाल तर मासिक सेवा शुल्क देखील पूर्वीपेक्षा जास्त भरावे लागेल.
किमान शिल्लक 15 हजारांवरून 25 हजारांपर्यंत वाढली
बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेत असे सांगण्यात आले आहे की 1 जून 2022 पासून बचत/पगार खात्याची टॅरिफ रचना बदलली जात आहे. शहरे आणि ग्रामीण भागात मासिक किमान शिल्लक 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे. याशिवाय ऑटो डेबिट यशस्वी न झाल्याच्या दंडातही वाढ करण्यात आली आहे. १ जुलैपासून लागू होणार आहे.
600 रुपये मासिक सेवा शुल्क
अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना खात्यातील किमान शिल्लक राखता येत नसेल, तर अधिक सेवा शुल्क भरावे लागेल. मेट्रो आणि शहरी भागांसाठी कमाल मासिक सेवा शुल्क आता 600 रुपये असेल. निमशहरी भागासाठी 300 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 250 रुपये असेल.
ऑटो डेबिट अयशस्वी झाल्यास असा दंड आकारला जाईल
नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस अयशस्वी झाल्यास शुल्क 500 रुपये करण्यात आले आहे. याअंतर्गत पहिल्यांदा 375 रुपये, दुसऱ्यांदा 425 आणि तिसऱ्यांदा 500 रुपये भरावे लागतील. ऑटो डेबिट फेल्युअरवरील शुल्क देखील 50 रुपयांनी वाढले असून ते 200 रुपयांवरून 250 रुपयांपर्यंत वाढले आहे.
चेकबुकसाठी जास्त पैसे द्यावे लागतील
आता जर तुम्ही बँकेकडून चेकबुक जारी केले तर तुम्हाला त्याची जास्त किंमत मोजावी लागेल. बदलानंतर प्रति पानाच्या चेकबुकची किंमत 2.50 रुपयांवरून 4 रुपये करण्यात आली आहे. हा बदलही १ जुलैपासून लागू होणार आहे. फिजिकल डिटेल्स आणि डुप्लिकेट पासबुक फीसाठी 75 रुपयांऐवजी आता 100 रुपये भरावे लागणार आहेत. हा बदलही १ जुलैपासून लागू होणार आहे.