प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे धावणाऱ्या पुणे-हाटिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यात वाढ

नोव्हेंबर 4, 2023 12:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२३ । सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेवून विशेष रेल्वे गाडया चालविण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. याच दरम्यान, भुसावळ मार्गे धावणाऱ्या पुणे-हाटिया-पुणे या रेल्वे गाडयांच्या १० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे घेतला आहे.

pune hatia express jpg webp

०२८४५ साप्ताहिक उत्सव विशेष रेल्वेगाडी पुणे येथून दर शुक्रवारी ३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान सकाळी १०.४५ वाजता निघेलआणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.२५ वाजता ती हटिया स्थानकावर पोहचेल. ०२८४६ साप्ताहिक उत्सव विशेष १ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी रात्री ९.३० वाजता हटिया येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २.४५ वाजता पुणे येथे पोहचेल.

Advertisements

या स्थानकावर असेल थांबा :
ही गाडी दौंड कार्डलाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला या रेल्वेस्थानकावर थांबे घेणार आहे.

Advertisements

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस (Bhusawal-Pune Hutatma Express) गाडी ही इगतपुरीपर्यंत रेल्वे लाईनच्या कामामुळे धावत होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी पाहता हुतात्मा एक्स्प्रेस ही अमरावतीपर्यंत नेण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे. ही गाडी आता पुणे- अमरावती हुतात्मा एक्स्प्रेस म्हणून असणार आहे.ही गाडी दौंड मार्गे वळवली असून ती आता पनवेल, कल्याण, नाशिक रोडमार्गे न धावता आता दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरामार्गे अमरावती अशी धावणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now