⁠ 
सोमवार, मे 6, 2024

LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ, वाचा नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली असून सर्वसामान्य माणसाचे जगणं मुश्किल झालं आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असतानाच आता LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याने दिलासा मिळाला आहे.

एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ
नवी किंमत लागू झाल्यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2253 रुपयांवरून 2355.50 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच आता व्यावसायिक सिलिंडरसाठी ग्राहकांना 102.50 रुपये मोजावे लागणार आहेत. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरवर ही वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी, 5 किलोच्या छोट्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता 655 रुपयांवर गेली आहे.

गेल्या महिन्यातही भाव वाढले होते
गेल्या महिन्यातही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. त्यादरम्यान 1 एप्रिल रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 268.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यांत व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅसमध्ये आतापर्यंत ४४८.५० रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, घरगुती एलपीजी ग्राहकांबद्दल बोलायचे झाल्यास, 22 मार्च रोजी विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये 50 रुपयांची वाढ झाली होती.

व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत
1 मे रोजी लागू झालेल्या नवीन दरांनुसार 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत 2,355 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये, व्यावसायिक गॅसच्या किमतीत सर्वाधिक 104 रुपयांनी वाढ झाली आहे, तर दिल्लीमध्ये ती 102 रुपयांच्या आसपास आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2,455 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी त्याची किंमत 2351.5 रुपये होती. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 102 रुपयांनी वाढ झाली असून, नवीन दर 2307 रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी त्याची किंमत 2205 रुपये होती.

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत
दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत सध्या 949.5 रुपये आहे. नोएडामध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 947.50 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 976 रुपये, मुंबईत 949.50 रुपये आणि चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 965.50 रुपये आहे. लखनऊमध्ये किंमत 987.50 रुपये आणि पटनामध्ये 1039.5 रुपये आहे.