महाराष्ट्र

अबब.. महाराष्ट्रातील या ठिकाणी 58 कोटीची कॅश अन् 32 किलो सोन्यासह 390 कोटींची मालमत्ता जप्त, IT ची कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ | कोट्यवधी रुपयांची अघोषित, बेकायदेशीर आणि बेनामी संपत्ती म्हणजेच देशात दडवलेला काळा पैसा पकडण्यात अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि आयकर विभागासाठी हे वर्ष खूप यशस्वी ठरले आहे. दरम्यान, राज्यातील जालना (Jalna) येथील स्टील व्यावसायिकावर इनकम टॅक्सने (Income Tax Raid) छापा टाकला. या छाप्यामध्ये तब्बल 58 कोटी रुपयांची रक्कम आणि 32 किलो सोन्यासह 390 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वऱ्हाडाच्या गाड्यांमधून येत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. दुल्हन हम ले जाएंगे, अशा स्वरुपाचे स्किकरही गाड्यांवर लावण्यात आल्याची माहिती समोर आलीय. यावेळी रोख रक्कम मोजण्यासाठीच तब्बल 14 तास लागल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 12 मशील रोख रक्कम मोजण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या.

१ ते ८ ऑगस्ट या कालावधीत जालना जिल्ह्यात रात्रंदिवस हे छापासत्र सुरु होते. या मोहीमेत आयकर खात्याचे तब्बल २६० कर्मचारी सहभागी झाले होते. साहजिकच इतक्या मोठ्याप्रमाणात आयकर खात्याचे कर्मचारी जालना जिल्ह्यात आले तर ते तात्काळ लक्षात आले असते आणि संबंधित स्टील व्यावसायिक सावध झाले असते. त्यामुळे आयकर खात्याचे कर्मचारी लग्नाचे वऱ्हाडी होऊन जालन्यात दाखल झाले.

या मोहिमेत नाशिक, मुंबई आणि ठाण्यातून आयकर खात्याचे कर्मचारी जिल्ह्यात दाखल झाले होते. जालन्यात प्रवेश करताना आयकर विभागाचे अधिकारी असलेल्या गाड्यांवर ‘दुल्हन हम ले जाएंगे’असे स्टीकर्स लावण्यात आले होते. या स्टीकर्सवर वधू आणि वराची नावंही लिहण्यात आली होती. त्यामुळे या गाड्यांमधून आयकर विभागाचे कर्मचारी इतक्या मोठ्या संख्येने जालना जिल्ह्यात दाखल झाल्याची गंधवार्ताही कोणाला लागली नाही. त्यामुळे आयकर खात्याची इतके मोठे धाडसत्र विनासायास पार पडले.

या ठिकाणी आढळली कॅश?
आयकर विभागाने मारलेल्या छापमारीमध्ये सुरुवातील कुठेच रोकड आणि बेनामी रक्कम आढळून आली नव्हती. मात्र त्यानंतर आयकर विभागाने संबंधित व्यावसायिकाच्या शहराबाहेर असलेल्या फार्महाऊसवर छापा टाकला. तिथे तपास केला. या तपासामध्ये कपाटाखाली, बिछान्यंमध्ये रोख रक्कम आढळून आल्याची माहिती समोर आलीय. इतकंच काय तर अडगळीमधील काही पिशव्यांमध्येसुद्ध रोकड सापडली. मोठ्या प्रमाणात नोटा आढळून आल्यानंतर आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले होते. तर दुसऱ्या एका व्यावसायिकाच्या घरातच अशाचप्रकारे रोख रक्कम आढळून आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button