जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२४ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. त्यानुसार जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५साठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांच्या खांद्यावर वाढीव शुल्काचा भार पडेल.
राज्य मंडळांने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना ४७० रुपये परीक्षा शुल्क, २० रुपये प्रशासकीय शुल्क, २० रुपये गुणपत्रिका लॅमिनेशन शुल्क, वीस रुपये प्रमाणपत्र शुल्क, १० रुपये प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय), १०० रुपये प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र विषय), १३० रुपये खासगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (माहिती पुस्तिकेसह), खासगी विद्यार्थी नोंदणी शुल्क १२१० रुपये आकारले जाणार आहेत.
पुनर्परीक्षार्थी अथर्थात रिपीटर व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्याच्याँच्या वाढीव शुल्काचा तपशील राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे श्रेणी सुधारण्यासाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.