---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

Jalgaon : पाच हजारांची लाच भोवली ; आयकर अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२५ । नवीन पॅनकार्ड रद्द करण्यासाठी पारोळ्यातील महिला डॉक्टराला ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आयकर अधिकाऱ्यासह शिपायाला पुण्याच्या सीबीआय पथकाने अटक केली आहे. संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता आयकर अधिकाऱ्याला न्यायालयीन कोठडी तर शिपायाला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

lach jpg webp webp

पारोळ्यातील महिला डॉक्टराचे सन २०१८ मध्ये पॅनकार्ड हरवले होते. त्यामुळे नवे पॅनकार्ड मिळावे म्हणून त्यांनी अर्ज केला होता आणि त्यानुसार त्यांना नवे पॅनकार्ड सुध्दा मिळाले. परंतू सन २०१८ ते २०२१ या वर्षांत त्यांचा आयकर भरला गेला नाही. महिला डॉक्टराच्या सीएने ही बाब तपासली असता जुन्या आणि नवीन पॅनकार्डचे नंबर वेगवेगळे असल्यामुळे आयकर भरला गेला नसल्याचे समोर आले. तेव्हा महिला डॉक्टराने नवीन कार्ड रद्द करण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला महिला पण, ते कार्ड रद्द झाले नाही.

---Advertisement---

म्हणून डॉक्टरसह हॉस्पिटलातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आयकर अधिकारी राकेशरंजन उमेश झा यांची भेट घेतली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे महिला डॉक्टराने कागदपत्रे सादर केली तरीही कार्ड रद्द झाले नाही. १० मार्च रोजी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी आयकर कार्यालयात गेले असता आयकर अधिकारी राकेशरंजन यांनी पॅनकार्ड रद्द करण्यासाठी १० हजाराची लाच मागितली. ही बाब हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लागलीच महिला डॉक्टराला कळवली. तेव्हा तत्काळ डॉक्टरने पुण्याच्या सीबीआयकडे तक्रार केली.

११ मार्चला हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आयकर कार्यालयात रंजन यांची पुन्हा भेट घेतली. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले. लाचेची रक्कम शिपायाकडे देण्यास सांगितली. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने दोघांना अटककरून गुन्हा दाखल केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment