यावल तालुक्यात बालविवाहाची धक्कादायक घटना समोर

फेब्रुवारी 17, 2025 12:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । देशात बालविवाह करणे हे कायद्यानुसार गुन्हा असला तरी बालविवाहाचे अनेक प्रकार समोर येत आहे. अशातच सांगली जिल्ह्यातील एका गावात राहणारी 16 वर्षीय मुलगीसोबत धक्कादायक प्रकार घडला.

crime 2 jpg webp

दोन वर्षांपूर्वी, तिच्या आई-वडिलांनी तिचा विवाह यावल तालुक्यातील एका मुलासोबत लावून दिला होता, तेव्हा ती फक्त 14 वर्षांची होती. अल्पवयीन असताना तिच्या पतीने तिच्यावर अत्याचार केले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली.

यावल तालुक्यातील ही घटना पोलिसांच्या नोटिसात आल्यानंतर, पीडित मुलीचा नवरा, सासरा, सासू आणि आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही घटना बालविवाहाच्या विदारक परिणामांचा प्रत्यय देते आणि समाजातील हा दुर्दैवी प्रकार थांबवण्याची गरज पुन्हा एकदा उघडकीस आणते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now