⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

अंगावर पेट्रोल टाकत महिलेने घेतले स्वतःला जाळून; पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 14 फेब्रुवारी 2024 । पाचोरा तालुक्यातील कजगाव रस्त्यावरील वाकडा पुलाखाली एका अज्ञात महिलेने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची धक्कदायक घटना १३ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास घडली. सदर महिला गरोदर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

पारोळ्याजवळील कजगाव रस्त्यावर असलेल्या वाकडा पूलाच्या खाली एका ३० ते ३५ वय असलेल्या अज्ञात महिलेने बाटलीमध्ये पेट्रोल भरून आणून आपल्या अंगावर टाकून वाकड्या पुलाच्या खालीच दगडावर बसून जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटना लक्षात आल्यानंतर पोलीस दाखल झाले. पंचनामा करत महिलेस कुटीर रुग्णालय येथे नेले असता डॉ. जितेंद्र पाटील यांनी तपासणी केली त्यात महिला ही गरोदर असल्याचा अंदाज वर्तविला आहे. परंतु शवविच्छेदनानंतर हे समजेल.

महिलेच्या अंगावर लाल रंगाची साडी, गळ्यात मंगळसूत्र, पायात चप्पल अशी चांगल्या घराण्यातील महिला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहे. पंचनामा करून सदर महिलेने आणलेली पेट्रोलची बाटली तसेच कपड्याचे नमुने व चप्पल ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.