भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थी ठार, जळगाव तालुक्यातील घटना

फेब्रुवारी 11, 2025 11:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नसून याच दरम्यान भरधाव कारने दुचाकीस्वार विद्यार्थ्यास जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील उमाळाजवळ घडली. मोहित संजय मोरे (वय २०, रा. उमाळा) असं मयत विद्यार्थ्याचे नाव असून या अपघातात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

accident jpg webp

जामनेर येथे डीफार्मसीच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असलेला जळगाव तालुक्यातील उमाळा येथील २० वर्षीय तरुण मोहित संजय मोरे हा क्लाससाठी दुचाकीने जळगावात येत होता. त्याच्या सोबत बारावीत असलेला गौरव अशोक जंजाळे (क्य १७, रा. उमाळा) हा परीक्षा सुरू होत असल्याने स्टेशनरी घेण्यासाठी सोबत येत होते.

त्यांना जामनेरकडून जळगावकडे येत असलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने मागून घडक दिल्याने ते फेकले गेले. त्यात मोहितचा जागीच मृत्यू झाला. तर गौरव जंजाळे हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now