गॅस कटरने कपाट कापून दागिन्यांसह रोकड लंपास ; भुसावळातील घटना

फेब्रुवारी 14, 2026 1:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ कमी होत नसून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान अशातच भुसावळ शहरातील मटन मार्केटच्या पाठीमागील परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी गॅस कटच्या साह्याने कपाट कापून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिन्यांसह ९५ हजारांचा ऐवज लांबवला.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

chalisgaon gharfodi 44 thousand

भुसावळ येथील रहिवासी जमीला रऊफ कुरेशी आईची प्रकृती बिघडल्याने बडनेरा येथे गेल्या होत्या. त्यांनी १२ फेब्रुवारीला मुलगी व जावयास घरी जाण्याचे सांगितले. त्या वेळी दोन्ही खोल्यांचे कडी-कोंडे तुटलेल्या अवस्थेत आढळले. एका खोलीतील पेटी फोडली होती तर दुसऱ्या खोलीतील कपाटांचे कुलूप तोडले होते. विशेष म्हणजे एका कपाटाचे कुलूप गॅस कटरने कापण्यात आले होते.

Advertisements

तसेच घरातील पलंग, बॅग, पिशव्या व तिजोरीतील साहित्य बाहेर फेकले होते. चोरट्यांनी सुमारे रोकडसह पाऊण ते एक किलो चांदीचे दागिने, फुलजोडी, चैन, पट्टया, जोडवे, पायातील बेडी, अंगठ्या तसेच तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने, गळ्यातील चेन, चावलपोत, सातपत्ती मंगळसूत्र व मुख्य मंगळसूत्र (मणी-पत्यांसह) असा ९५ हजारांचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीनंतर शुक्रवारी पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisements

नाल्यातून चोरटे आल्याचा अंदाज
पोलिस निरीक्षक राहूल वाघ व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत तपासली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीसाठी घेतले आहे. घराच्या बाजूला नाला असल्याने चोरट्यांनी नाल्याच्या बाजूने येत घरफोडी केल्याचा अंदाज आहे. हे घर बंद असल्याने चोरी नेमकी कोणत्या दिवशी झाली, याचा तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now